ब्रेकिंग
ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांनयवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का: विजय चोरडिया महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारची ‘बीमा आता २५ ऐवजी ७५ टक्के अग्निवीरांना मिळणार सैनएका दिवसात २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवआजचे राशीभविष्य, ९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीया

कांतारा चॅप्टर १ थिएटरमध्ये हाऊसफुल्ल असतानाही OTT वर लवकर का? निर्मात्यांचा खुलासा

On: October 29, 2025 12:17 PM
Follow Us:
kantara chapter 1 ott release

यवतमाळ लाईव्ह न्यूज: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा : चॅप्टर १’ हा पौराणिक ॲक्शन चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं जगभरात ८१६ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. २०२५ सालातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलेला हा सिनेमा विकी कौशलच्या ‘छावा’ (८०७ कोटी) लाही मागं टाकून पुढं आहे. अनेक ठिकाणी थिएटरमध्ये अजूनही हाऊसफुल्ल बोर्ड लागत असताना चित्रपट लवकरच OTT वर येतोय, यामुळं चर्चा रंगली आहे.

चित्रपटाचे सह-निर्माते चेलुवे गौडा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या मते, हा निर्णय तीन वर्षांपूर्वी झालेल्या करारामुळं घेतला आहे. “त्या वेळी रिलीज विंडोची पद्धत वेगळी होती. आता हा करार पूर्ण करणं आमच्यासाठी बंधनकारक आहे,” असं गौडा म्हणाले. सध्या दक्षिण भाषेतील आवृत्त्या ३१ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर उपलब्ध होतील. हिंदी आवृत्ती मात्र आठ आठवड्यांनंतर येईल.

कोव्हिडनंतरच्या काळात मोठ्या चित्रपटांसाठी थिएटर ते OTT असा गॅप चार आठवड्यांपर्यंत कमी झाला आहे. तरीही ‘कांतारा : चॅप्टर १’ सारख्या यशस्वी सिनेमाची इतक्या लवकर OTT रिलीज इंडस्ट्रीत फारशी आढळत नाही. पण कराराच्या बंधनामुळं निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. थिएटरमधील धाव संपलेली नसतानाही OTT रिलीज होत असल्यामुळं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा दोन्ही वाढल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!