ब्रेकिंग
वणी-घुग्गुस मार्गावर हृदयद्रावक अपघात; मुलीलमहिला उद्योजकांसाठी स्वर्णिमा योजना! २ लाखांइंस्टाग्रामच्या आहारी जाऊन तरुणाची तलवारीनआता २५ ऐवजी ७५ टक्के अग्निवीरांना मिळणार सैनआता ओला-उबरला करा टाटा? ‘भारत टॅक्सी’ चा नवतुकडेबंदी कायद्यात सुधारणा, मंत्रिमंडळाचा म

तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य; काही जागा राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

On: October 17, 2025 10:51 AM
Follow Us:
talathi bharti update

मुंबई (यवतमाळ लाईव्ह न्यूज): राज्यातील महसूल सेवकांच्या रखडलेल्या मागण्यांबाबत सरकारने अखेर सकारात्मक पावलं उचलली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सेवकांना तलाठी पदांच्या भरतीत विशेष प्राधान्य देण्याची हमी दिली आहे. त्यामुळे या सेवकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

महसूल सेवकांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षपद महसूलमंत्री बावनकुळे यांनी भूषवले. यात सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये सामावून घेऊन त्यांना मानधनाऐवजी नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी चर्चिली गेली. मात्र, विद्यमान नियमांनुसार हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

त्याऐवजी एक पर्याय म्हणून तलाठी भरतीत या सेवकांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव पुढे आला. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या सेवकांकडे किमान पाच वर्षांचा अनुभव आहे, त्यांना भरती प्रक्रियेत २५ अतिरिक्त गुण दिले जातील. तसेच, त्यांच्या अनुभवाचा विचार करून काही जागा राखीव ठेवण्याचा विचार आहे. या प्रस्तावाला बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का: विजय चोरडिया यांनी घेतला शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत महसूल सेवकांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, या सेवकांच्या मानधनात आधीच वाढ करण्यात आली आहे आणि सरकार त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

बैठकीत एक मुद्दा असाही उपस्थित झाला की, पुराच्या काळात काही महसूल सेवक संपावर गेल्यामुळे प्रशासनाला त्रास सहन करावा लागला. तरीही, ऑनलाइन सेवांमुळे त्यांचे काम काहीसे कमी झाले असले तरी, त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या प्रशासनाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी होईल. त्यामुळे सेवकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहनही करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Pune Land Scam

पुणे जमीन घोटाळा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, विजय वडेट्टीवारांची मागणी

shetkari karj mafi charcha

शेतकरी कर्जमाफीवर उशिरापर्यंत तुंबळ चर्चा; सह्याद्रीत काय झाली चर्चा वाचा सविस्तर

maharashtra board exam 2025 time table

मोठी बातमी ! दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

ganja zade japt yavatmal

यवतमाळ क्राइम | कापूस व तुरीच्या ओळीत लावली होती ११३ गांजाची झाडे; पोलिसांनी छापा टाकून शेतकऱ्याला केले अटक

sachin chandwade suicide

‘जामतारा २’ अभिनेता सचिन चांदवडेचा २५ व्या वर्षी आत्महत्येने शेवट, ‘असुरवन’ रिलीज होण्यापूर्वीच जग सोडले

pm mudra loan yojana

व्यवसाय सुरु करायचाय? कोणत्याही गॅरंटीशिवाय सरकार देतंय २० लाखांचे लोन; अर्ज कसा करावा?

1 thought on “तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य; काही जागा राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय”

Leave a Comment

WhatsApp Join Group!